डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयाचा उपक्रम
भद्रावती
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ . विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावती येथे अंशिका क्लिनिक द्वारे आयोजित रक्तदान शिबिर व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. ६० हुन अधिक विद्यार्थांनी रक्ततपासणी केले. संस्थेचे संस्थापक डॉ . कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. सामाजिक कार्यकर्ते शशी कुमार चौधरी यांनी शिबिराचे संयोजन केले असून अंशिका क्लिनिकच्या महाब्लड सेंटरतर्फे संपूर्ण आयोजन केले होते.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त,माजी प्राचार्य ,डॉ. जयंत वानखेडे म्हणाले की, “रक्तदान हे एक अमूल्य दान आहे. दान केलेले रक्त गरजूंना जीवनदान तर देतेच त्याचबरोबर दात्यालाही आत्मिक समाधान मिळते”. रक्तदान तपासणी शिबिरात डॉ. सुधीर मोते, डॉ. प्रशांत पाठक प्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा मानकर यांनी केले असून प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. प्रीती कंनकट्टीवार, सीमा हवेलीकर , पूनम काळे, नेहा सुरतीवार यांच्या सहकार्याने पार पडला असून कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनातून प्रा. प्रज्ञा लांडे यांनी केला.






