भद्रावती
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. प्रशासकीय महाविद्यालय भद्रावती येथे विद्यार्थांचे स्वयंशासन उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी एक दिवस स्वतः महाविद्यालय चालवले. आचल उइके, स्नेहा तुंबडे, तन्वी देवतळे, साक्षी बेलेकर, गीता कपाट या विद्यार्थिनीने सहकारी शिक्षक म्हणून अतिशय शिस्तबद्ध आणि उत्तम नियोजन करून स्वयंशासन उपक्रम पार पाडले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले. तसेच शालेय स्वयंशासन यांचे मूल्यमापन करण्यात आले.
शिक्षकाचे कार्य हे एक व्रत आहे, संकटं कितीही आली, तरी सत्य सोडू नका. असा संदेश प्रा. नेहा मानकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी यावेळेस दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाठक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व पटवून देऊन आदर्श विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आचल उइके या विद्यार्थांनी केली असून कार्यक्रमाचे आभार कु. स्नेहा तुंबडे हिने केले. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. प्रज्ञा बुरडकर, प्रा. प्रीती कनकट्टीवार, प्रा. कपिल राऊत व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






