सावली
सत्र २०२५ – २६ या वर्षातील विकास विद्यालय तथा विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता. सावली जि. चंद्रपूर येथे “मराठी भाषा विषयाची’ वर्ग सभा संपन्न झाली. प्राचार्या कु. गराटे मॅडम यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपक्रमाचा भाग म्हणून वर्ग दहावीच्या मराठी विषयाच्या डॉ. धर्मा वाघुजी गावंडे या उपक्रमशील शिक्षकांनी वर्गसभा आयोजित केली. कधीकधी छोट्या छोट्या कार्यक्रमात मोठा अर्थ प्राप्त होतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रमाची परंपरा ते जपत असतात. विद्यार्थ्यांना वर्गातच दिलखुलास संधी देण्याचे काम विकास विद्यालयात होत असते.
वर्गात व्यक्त होण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळण्याची सवय कायम रहावी , संवाद आणि संवेदनशीलतेच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. चालू सत्रातील झालेल्या अभ्यासक्रमावर चर्चा व्हावी, वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ आहे. याप्रसंगी वर्गसभेला अध्यक्ष म्हणून वर्ग मंत्री साहिल बानबले, प्रमुख अतिथी अनुष्का कोलते, सानिया हुलके, मीनल घोडमारे, आदित्य भोयर वर्ग दहावीचे हे सर्व विद्यार्थी मंत्री आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी अनुष्का कोलते हिने केले, तर माही लोहंबरे, तन्मय बारेकर, अक्षरा वाढणकर, जानवी भोयर, मीनल घोडमारे, साहिल बानबले या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी विषय आम्हाला छान समजला अशा पद्धतीने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतिका गेडाम हिने केले तर आभार प्रदर्शन आदित्य भोयर या विद्यार्थ्याने मानले कार्यक्रमाला वर्ग दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.






