spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्री शिव छत्रपती महाविद्यालय अव्वल

पुणे

क्रीडा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील खेळाडूंनी तायक्वांडो क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करत जिल्हास्तरावर माजल घेतली आहे. चैतन्य विद्यालय ओतूर येथे दि 28/08/2025 रोजी झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील सात खेळाडूंनी सहभाग घेऊन या सातही खेळाडूंनी विविध वजनी गटात विशेष प्राविण्य प्राप्त केले.
1) कु कार्तिकी मनसुख -46 ते 49 गटात- गोल्ड मेडल
2) तनया पिंपळे – 68 किलो वरील गटात – गोल्ड मेडल
3) सुजल रोकडे -59 ते 63 किलो गटात – गोल्ड मेडल
4) स्वयम विरणक – 45 ते 48 किलो वजनी गटात – गोल्ड मेडल
5) स्वराज पठारे – 48 ते 51 किलो वजनी गटात – गोल्ड मेडल
6) प्रथमेश शिरसाठ – 55 ते 58 किलो वजनी गटात – गोल्ड मेडल
7) सिद्धेश मुऱ्हे – 51 ते 55 किलो वजनी गटात- गोल्ड मेडल
श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील या सातही खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवून महाविद्यालयाचे व संस्थेचे नाव उंचावले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी वाघमारे, उपप्राचार्य डॉ आर डी चौधरी,कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा एस ए श्रीमंते यांनी मिळवलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांना जिमखाना विभाग प्रमुख प्रा मयुर बोंबले यांनी मार्गदर्शन केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!