भद्रावती
यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय भंगाराम वॉर्ड येथे दहीहंडी चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच रक्षाबंधन निमित्त राखी स्वनिर्मिती, दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. सौं रोशनी कार्तिक शिंदे, प्रमुख पाहुण्या प्रा. सौं उज्वला वानखेडे मॅडम यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिंचोर्डी, तसेच अंगणवाडी सेविका सौं सुनीता पिंपळकर मॅडम, देवगडे मॅडम मुख्याध्यापिका सौं पपीया बिस्वास मॅडम यांनी दिपप्रज्वलंन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमच्या अध्यक्षा सौं रोशनी मॅडम यांनी आधुनिक विचाराची जोड देत ससा आणि कासव या कथेतून विध्यार्थ्यांना आपल्या मध्ये असणाऱ्या सुप्त गुणांचा कशाप्रकारे उपयोग करता येईल आणि कश्याप्रकारे आपल्याला यशस्वी होता येईल याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौं उज्वला मॅडम यांनी विध्यार्थ्यांना दहीहंडी का साजरी केली जाते? त्याचे महत्व विध्यार्थ्यांना कथेतून पटवून सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौं पपीया बिस्वास यांनी प्रास्ताविकेतुन सांगितले कि आपल्या मनात मैत्री व सहकार्यांची भावना निर्माण होते. या कार्यक्रमाला शाळेच्या विध्यार्थ्यानी श्रीकृष्ण, राधा, गोपिका च्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आकांक्षा शेंडे वर्ग 5 वा आणि रक्षा सिडाम वर्ग 7 वा यांनी सुंदर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विध्यार्थ्यानी स्वतःशाळेमध्ये तयार केलेल्या राख्या व दहीहंडी मटकी सजावट यांची प्रदर्शनी करण्यात आली. आणि निरीक्षक म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौं रोशनी शिंदे मॅडम आणि प्रमुख पाहुण्या सौं उज्वला वानखेडे मॅडम होत्या. यांनी प्रदर्शनीचे निरीक्षण करून प्रथम व द्वितीय क्रमांक देऊन विध्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. वेशभूषा च्या आधारे विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शेवटी गोविंदाचे नारे लावून दहीहंडी फोडून कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्री घोरुडे सर यांनी केले. आणि आभार श्री मडावी सर यांनी मानले. कार्यक्रमाला सहकार्य श्री आत्राम सर, प्रीती मेश्राम मॅडम, तसेच शाळेचे कर्मचारी सौं नेहा शिडाम,, सौं सुषमा गेडाम, माजी विध्यार्थ्यानी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यात आला.






