भद्रावती : भद्रावती शहरातील स्थानिक NGO “हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती” द्वारा 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वर्ष 4 थे, – सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा – 2025” दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.

ही स्पर्धा परीक्षा वर्ग 5 ते 7 ‘अ- ग्रुप’ आणि वर्ग 8 ते 10 ‘ब- ग्रुप’ या दोन ग्रुपमध्ये घेतल्या गेली. स्पर्धेकरिता भद्रावती शहरातील व आसपास च्या गावांमधील 650 विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम 15 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आला. गट अ मधुन पहिल्या क्रमांक नुहा शेख़ या विद्यार्थिनीने पटकवला. हिला रोख रक्कम एस. एस. इलेक्ट्रिकल्स स्वप्निल मत्ते यांच्याकडून देण्यात आले. दुसऱ्या क्रमांक लावण्या खेडेकर या विद्यार्थिनीने पटकवला. हिला रोख रक्कम सुकेशनी मानकर यांच्याकडून देण्यात आले. तिसऱ्या क्रमांक महेक शेख या विद्यार्थिनीने पटकवला. हिला रोख रक्कम शितल मांडवकर यांच्याकडून देण्यात आले.गट ब मधुन पहिल्या क्रमांक अमित नळे या विद्यार्थ्याने पटकवला. याला रोख रक्कम ओरल केअर डेंटल क्लिनिक शुभम पाझारे यांच्याकडून देण्यात आले. दुसऱ्या क्रमांक आभा वाडके या विद्यार्थिनीने पटकवला. हिला रोख रक्कम पनवेल शेंडे यांच्याकडून देण्यात आले. तिसऱ्या क्रमांक अनुश चौधरी या विद्यार्थ्याने पटकवला. याला रोख रक्कम प्रभाकर उंबरकर यांच्याकडून देण्यात आले. दोन्ही ग्रुप मधील पारस माहुरे, श्लोक टोंगे, परिणिती बहादे, श्लोक भागवत, राजन्या दास, समृद्धी रामटेके, श्रुती रामटेके, धनीश उराडे, नैतिक पेटकर, कृष्णा उन्हाळे, श्रावणी लाखे या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गिफ्ट हेल्पिंग हँडस् टीमकडून देण्यात आले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह प्राध्यापिका संगीता बांबोडे यांच्याकडून देण्यात आले. तर सर्वच विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सोनल उमाटे व नितेश बानोत यांच्याकडून देऊन या सर्वांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सन्मान सोहळा जिल्हा परिषद हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज भद्रावती येथे स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमात पार पडला.

कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थिती शाळेच्या मुख्याध्यापिका गावंडे मॅडम, इतर सर्व शिक्षकवृंद व हेल्पिंग हँड्स संस्थेचे सर्व सदस्य यांनी मंचावर स्थान स्वीकारले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कृतांत सहारे यांनी हेल्पिंग हँड्स NGO च्या संपूर्ण कार्याबद्दल माहिती दिली. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यामागील दृष्टीकोन स्पष्ट केला की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात असल्यापासूनच भविष्यात सामना होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा आढावा मिळावा व त्यांना या परीक्षांमध्ये यश संपादन करण्याकरिता मदत व्हावी व भारताचे एक सृजक नागरिक व कर्मचारी म्हणून त्यांची जडण-घडण व्हावी हा सांगितला.






