spot_img
spot_img
29 C
New York
Saturday, June 6, 2026

डोलारा प्रभागातील रस्त्याच्या डागडुजीची मागणी

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टिचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

भद्रावती : डोलारा प्रभागातील ज्योती झेरॉक्स जवळ, सुरज मेश्राम यांच्या दुकानासमोरील रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत असून, त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती तर्फे नगरपालिकेकडे करण्यात आली आहे. मंगळवारी पक्षाच्या वतीने नगर परिषद भद्रावतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष विकास दुर्योधन, भद्रावती शहर महासचिव मिलिंद राहुलगडे, शहर सचिव स्वप्नील कोल्हटकर उपस्थित होते. पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, सदर रस्ता गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्त न झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालक, पादचारी आणि शालेय मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघातही घडले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप डागडुजी न झाल्याबद्दल नागरिकांत नाराजी आहे. निवेदनाद्वारे पक्षाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!