भद्रावती :
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ या सत्रात विद्यालयाचे प्राचार्य डॉ सुधीर मोते यांचे अध्यक्षतेखाली पालक – शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. या सभे करीता उपस्थित पालकांमधून प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
शिक्षक -पालक संघाचे अध्यक्ष डॉ सुधीर मोते, उपाध्यक्ष विक्की कोंडावार, सचिव हरीहर मोहरकर, सहसचिव रिनाताई नगराळे, पालक प्रतिनिधी अमिता राहुलगडे, अशोक ठाकूर, विद्यार्थी प्रतिनिधी फरमान शेख, कु. तनुजा तेलंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पालकांनी व शिक्षकवृंदानीं नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या सभेला पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन एस. जी. नंदनवार व आभार प्रदर्शन आर. एल. बनकर यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृद, प्राध्यापकांनी सहकार्य केले.






