प्रवीण महाजन अध्यक्ष, विक्रांत बिसेन सचिव तर आनंद शिरसागर कोषाध्यक्ष
भद्रावती
रोटरी क्लब भद्रावती ची सन २०२५-२६ या वर्षाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात भद्रावती रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी व्यावसायिक प्रवीण महाजन यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी विक्रांत बिसेन यांची निवड झाली. त्याचप्रमाणे रोटरी क्लब भद्रावती च्या कोषाध्यक्षपदी आनंद क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रोटरी क्लब भद्रावती हे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संस्था आहे. भद्रावती शहरात रोटरी क्लब मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा 25 जुलै रोज मंगळवारला सेलिब्रेशन मंगल कार्यालय भद्रावती येथे होणार आहे.






