spot_img
spot_img
23.4 C
New York
Saturday, June 6, 2026

श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

भद्रावती :- भद्रावती येथील श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिराचा वर्धापन दिन रविवार, दि. १५ जून २०२५ रोजी भक्तिभावाने व उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता दैनंदिन आरती व पूजा पाठाने होईल. त्यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत श्री विष्णु पंचायतन याग संपन्न होणार आहे. दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत भक्तिगीते व भजनसंध्या रंगणार असून, त्यानंतर ३.०० ते ५.०० या वेळेत गुरुचरित्रातील १४ वे अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात येईल.
संध्याकाळी ६.१५ वाजता श्री गणेश आरती व पूजन, तर सायंकाळी ७.०० ते ८.०० दरम्यान दैनंदिन विशेष उपासना होईल. रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत महाप्रसाद व भजनसंध्या याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिर, श्री दत्तवाडी, सानेगुरुजी सोसायटी, भद्रावती येथे पार पडणार आहे. या उत्सवाचे आयोजन प.पू. श्री विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्मिक साधना केंद्र, भद्रावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सर्व भक्तगणांनी या कार्यक्रमात सहकुटुंब उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!