spot_img
spot_img
20.7 C
New York
Monday, June 8, 2026

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्थेच्या अध्यक्ष पदी गुरुदास ठाकरे तर उपाध्यक्षपदी देवानंद नाकाडे यांची निवड

प्रतिनिधी चिमुर :-
राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था चिमुर चे अध्यक्ष पदावर गुरुदास ठाकरे तर उपाध्यक्ष देवानंद नाकाडे यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रीयेच्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणुक निर्णय अधिकारी सौ. के. बी. वडते होत्या.

राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि. 3 एप्रिल 2025 च्या पत्रानुसार राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था चिमुर ची सन 2025-26 ते 2030-31 या कालावधी करीता संचालक मंडळाची निवड प्रक्रिया पार पडली होती.

तालुका निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका चिमुर यांनी जाहिर केलेल्या दिनांक 14 मे 2025 च्या अधिसुचनेनुसार निवडणुकीनंतर प्राप्त अहवालानुसार संस्थेच्या कार्यालयात शुक्रवार (30 मे) रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवड करण्याकरीता नवनिर्वाचीत संचालकाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी सौ. के. बी.वडते, प्रशासक पि.के. प्रधान, प्रभारी व्यवस्थापक गिरीधर मोहिनकर, वसुली अधिकारी तेजराम लांडे आदि उपस्थित होते.

यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था चिमुर चे अध्यक्ष पदावर गुरुदास ठाकरे तर उपाध्यक्ष देवानंद नाकाडे यांची अविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचीत संचालक मंडळात अविनाश हरीराम रासेकर, प्रदीप रघुनाथ लांडे, अतुल दादाराव हतोलकर, अशोक मारोतराव हजारे, संजय रामचंद्र नवघडे, सुरेश दौलतराव डांगे, किशोर बगन अंबादे, नंदु मोतिराम मोहिनकर, सौ. दुर्गा सुरेश शेंडे, सौ. पुजा उमेश मोहिनकर यांचा समावेश आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!