spot_img
spot_img
26.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

अरविंद विद्यानिकेतन शाळेत शिक्षक – पालक सभा संपन्न

भद्रावती : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे काळाची गरज आहे. इंग्रजी ही जागतिक स्तरावर संपर्क भाषा आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे. भद्रावती शहरातील सर्वसामान्य परिवारातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी अरविंद विद्या निकेतन सुरू केले आहे. शिक्षणप्रेमी पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश देऊन शैक्षणिक प्रगती साधावी असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालय परिसरात नुकत्याच सुरू झालेल्या अरविंद विद्या निकेतन इंग्लिश मीडियम शाळेत अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ सुधीर आस्टुनकर, शाळेच्या प्राचार्या प्रिती क्षिरसागर, डॉ यशवंत घुमे उपस्थित होते. यावेळी डॉ.आस्टुनकर यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण कसे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रिती क्षिरसागर, संचालन शिक्षिका विजया साव, आभारप्रदर्शन उज्ज्वला मत्ते यांनी केले.यावेळी स्नेहा सुहास गिरसावळे, किशोरी आकाश कटलावार, शुभांगी सचीन ताजने, रश्मी आशीष चौधरी, अष्लिषा राजेश जंजलवार, मयुरी नितेश दाभेकर, पुजा प्रविण किटे, स्वाती विनोद लोंढे, जोहरा कुशाल चंद्रगिरी, आशीष दुपारे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!