भद्रावती : नगरपरिषद हद्दीतील काही भागांमध्ये महावितरण द्वारे झाडांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल केल्याचे प्रकार समोर आले आहे. या घटनेची तातडीने दखल घेऊन शिवसेना भद्रावतीच्या वतीने नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज शहा यांच्या नेतृत्वात नगर परिषद भद्रावती, वनविभाग भद्रावती व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

नगरपरिषद भद्रावती यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, महावितरण MSEB कडून फक्त झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पत्र प्राप्त झाले होते. मात्र, झाडे कापण्याची कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. असेच स्पष्टीकरण वनविभाग भद्रावती व तहसील कार्यालय भद्रावती यांच्याकडून देखील देण्यात आले आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर आणि झाडांची अनधिकृत कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व भविष्यात अशा प्रकारास आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या असे पत्र देण्यात आले. यावेळी शिवसैनिक सुरज शाहा, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक सुमित हस्तक, शिवसैनिक दीप गारघाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






