spot_img
spot_img
26.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांची भद्रावती अभ्यास केंद्रास भेट

भद्रावती : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा लवकरच सुरू होत आहे. त्या सुरळीत पार पडाव्यात या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवरील सोयी सुविधांचे परीक्षण करण्याकरिता व अभ्यास केंद्र अवलोकनार्थ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील विभागीय केंद्राचे वरिष्ठ संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांनी स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राला भेट दिली.

यावेळी त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातील (4227A) अभ्यास केंद्रावरील सर्व सोयीसुविधांची पाहणी केली. निरीक्षण करून उपलब्ध सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले. विशेषतः महाविद्यालयातील स्वच्छता व अभ्यास केंद्राचे कामकाज बघून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अभ्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत नागपूर विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सेलर डॉ.पांडुरंग डांगे उपस्थित होते. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. नामदेव उमाटे, उपप्राचार्य तथा ग्रंथपाल डॉ. सुधीर आस्टुनकर, केंद्र संयोजक डॉ यशवंत घुमे, सहसंयोजक आशिष दुपारे, या अभ्यास केंद्राच्या माजी केंद्र संयोजक प्रा. संगीता बांबोडे व सेवक संजय तामगाडगे यांची उपस्थिती होती.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!