spot_img
spot_img
27.4 C
New York
Wednesday, July 29, 2026

इयत्ता बारावी पर्यंत मराठी अनिवार्य… पुढील सत्रात अंमलबजावणी करावी..

मराठी विषय शिक्षक महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचे
शासन आदेश पारीत झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक सत्रापासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हावी, यासाठी मराठी विषय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

मराठी भाषा आता ही अभिजात झालेली आहे. महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी हा विषय अनिवार्य झाला आहे. त्यासंदर्भात शासन आदेश १३ सप्टेंबर २०२४ ला निघाले आहे. मराठी भाषा धोरण शासनाने जाहीर केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी मराठी भाषा इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत अनिवार्य हे धोरण पुढील सत्रा पासून लागू व्हावे, यासाठी मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री, उदय सामंत शिक्षण मंत्री, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याशी मराठी भाषा धोरण व मराठी भाषा अनिवार्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात यापुढे मराठीची दुरावस्था होणार नाही यासाठी मराठी विषय शिक्षक महासंघ आग्रही आहे, या बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद करण्यात आला.

जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन
देताना प्रा. डॉ ज्ञानेश हटवार उपाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ विजय हेलवटे सल्लागार, प्रा. नामदेव मोरे जिल्हाध्यक्ष, प्राचार्य डॉ. सुधीर मोते मार्गदर्शक, प्रा. किशोर ढोक जिल्हा संघटक, प्रा. सरिता कंचेवार मॅडम तालुका अध्यक्ष चंद्रपूर, प्रा. महेश गेडाम तालुका अध्यक्ष राजुरा,
प्रा. जे. एम. राजुरकर , आर आर बारसागडे, तसेच मराठी विषय शिक्षक महासंघाचे समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!