spot_img
spot_img
23.4 C
New York
Monday, June 8, 2026

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शेतीविषयक प्रायोगिक शिक्षण कार्यक्रम…..

भद्रावती

भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील स्वयंसेवक तसेच विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शेतीविषयक प्रायोगिक शिक्षण कार्यक्रम (ELP) बाबत उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. यानिमित्ताने स्वयंसेवकांची डिजिटल पीक सर्वेक्षण आणि शेतकऱ्यांच्या e-KYC प्रक्रियेत सक्रिय सहभाग असेल, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीचे आधुनिकीकरण करण्यास मदत होईल. हा हेतू लक्षात घेऊन महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजनेद्वारे “माय भारत आउटरीच प्रोग्राम फॉर ELP इन डिजिटल अ‍ॅग्रीकल्चर” मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला गेला.

भद्रावती शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने केली. डिजिटल शेती अभियान हा राष्ट्रीय उपक्रम असून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी डिजिटल सेवा सक्षम करतो असे मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणातून प्रा. राजेंद्र साबळे यांनी केले. शेतकरी नोंदणी व e-KYC भारताच्या अ‍ॅग्रीस्टॅकचा महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे जमीन धारणा, पिकांचे प्रकार, शेतकऱ्यांची माहिती यांचा समावेश असलेला डेटा संकलित केला जातो आणि शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकतो असे मार्गदर्शन डॉ. प्रशांत पाठक यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी महाविद्यालयातील दोन “माय भारत यूथ अ‍ॅम्बेसेडर” निवडण्यात आले.


याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा मानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मोबाईल-आधारित सर्वेक्षण असून, जीओ-फेन्सिंग आणि उपग्रह इमेजिंगच्या माध्यमातून थेट पीक डेटा संकलन होते, ज्याचा उपयोग विविध हितधारकांसाठी केला जातो तसेच पारंपरिक शेतीविषयक मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी ELP इन डिजिटल अ‍ॅग्रीकल्चर या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी सक्रिय सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती कांकट्टीवार यांनी केले असुन आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा बुरडकर यांनी केले.


याप्रसंगी महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. काळपांडे, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. कपिल राऊत, सीमा हवेलिकर व पुनम काळे उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!