भद्रावती
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व पंचायत समिती भद्रावती मार्फत आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० भद्रावती येथे सुरू आहे. भद्रावती जवळ असलेल्या साई इंजिनिअरिंग कॉलेज लोणारा, भद्रावती येथे हे १ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे साहेब यांनी भेट दिली.
श्री साई इंजिनिअरिंग कॉलेज भद्रावती येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणात आज शिक्षक प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे सर यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिली . प्रशिक्षण ठिकाणी असलेली व्यवस्था बघितली व प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला, तसेच सर्व सुलभकांशी चर्चा केली. यावेळी भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ प्रकाश महाकाळकर व श्री साई इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ विनोद गोरंटीवार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री साई इंजिनिअरिंग कॉलेज लोणारा, भद्रावती येथे आजपासून शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू झाले. यात प्राथमिक विभागाचे तसेच माध्यमिक व जूनियर विभागाचे शिक्षक मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत. या दोन्ही कुलाचे प्रशिक्षण याच महाविद्यालयात होत आहेत. यावेळी प्राथमिक विभागाचे ९ सुलभक व माध्यमिक विभागाचे ९ सुलभक तसेच अरविंद गायकवाड, सुनील मामीडवार व पंचायत समिती बिआरसीचे कर्मचारी उपस्थित होते.






