spot_img
spot_img
20.1 C
New York
Tuesday, June 9, 2026

महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा लाभ

चंद्रपूर


महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर या महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर तर्फे कमवा व शिका योजनेतील लाभान्वित विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले . गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा राबविण्यात येणाऱ्या कमवा व शिका योजने अंतर्गत महाविद्यालयात सत्र २०२३-२०२४ या वर्षासाठी अमलात आणल्या गेली. महाविद्यालयाच्या ८२ विद्यार्थ्यांनी वर्षभर महाविद्यालयाचा विविध विभागात दररोज किमान तीन तास काम केले. त्याचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविण्यात आला व विद्यापीठाद्वारे दोन लाख नऊ हजार एकशे साठ रुपये मंजूर झाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे धनादेशा च्या रूपात वितरित करण्यासाठी डॉ. अजय कुमार शर्मा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे होते. याप्रसंगी मा. श्री विठ्ठलरावजी थिपे, उपाध्यक्ष, ग.शि . प्र. मं, गडचांदूर मा धनंजयजी गोरे, सचिव, ग.शि . प्र. मं, गडचांदूर, मा. रामचंद्रजी सोनपितरे संचालक सदस्य, ग.शि . प्र. मं, गडचांदूर हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून हजर होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोहर बांदरे यांनी केले. सभेचे आभार प्रदर्शन प्रा. चेतन वैद्य यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. अनिस खान प्रा. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे, प्र. संदीप घोडिले तसेच शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी हजर होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!