शेगाव सोबतच परिसरातील समस्त नाभिक बांधवांचा उत्सपूर्त सहभाग
दि. २८ डिसेंबर रोज शनिवारला शेगाव बु येथे नाभिक मंडळ शेगाव तर्फे नाभिक समाजाचे नगाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने साई नगरी कोटकर ले आउट मध्ये सर्व समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजण करण्यात आले होते. ज्या मध्ये गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यकमाची सुरुवात ही नगाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्या नंतर भजनाचा कार्यकम पार पडला नंतर महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या नंतर सम्पूर्ण गावामधून नगाजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली व शेवटी समस्त समाज बांधवाना भोजनदान देण्यात आले.
या कायक्रमासाठी धन्नू कडवे, रवी वाटकर, नितीन कुंदनकर, विकास जांभुळकर, अनिल घुमे, जीवन वाटकर, गजानन मांडवकर, केशव कडवे, अर्जुन मांडवकर, प्रफुल जुनारकर, विवेक घुमे, अनिल घुमे, होमराज घुमे आदिनी परिश्रम घेतले.






