spot_img
spot_img
22.4 C
New York
Friday, July 31, 2026

एनसीडीसी मार्फत चंद्रपुर जिल्ह्यातील मच्छीमारांना मार्गदर्शन

चंद्रपूर : ‘एनसीडीसी’ चे लक्ष्मणराव इनामदार ‘नॅशनल ॲकॉडनी फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र’ आणि केंद्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी एकलव्य मुलांचे वसतिगृह चंद्रपूर येथे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेला प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश धोपे, राष्ट्रीय विकास निगम उपसंचालक पुनीतकुमार गुप्ता,पुणे,महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे संचालक चन्द्रलाल मेश्राम, सीडीसीसी बँके चे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे तसेच जिल्ह्यातील मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे उपसंचालक पुनीत कुमार गुप्ता यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून मान्यवरांचे स्वागत केले. तसेच विविध योजनांची माहिती दिली.महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे संघाचे संचालक तथा माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांनी एनसीडीसी कडून विविध योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच मच्छीमार संघांना मिळाल्याची माहिती दिली. तसेच एनसीडीसीचे आभार मानले. गुणवत्ता पूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन त्याची उपलब्धता मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्यव्यसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सहकारी संस्था स्थापन करायला हव्यात असेही त्यांनी सांगितले. मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (एफएफपिओ) असलेल्या योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत आशिष शिरसाठ, एनसीडीसी प्रोग्राम ऑफिसर ह्यांनी मार्गदर्शन केले. मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे श्री दिनेश धोपे यांनी मच्छीमार संस्थांना किसान क्रेडिट कार्ड, अपघात गटविमा तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. तसेच सीबीबीओ चे कन्सल्टंट श्री नितीन शिंगाडे यांनी पीएफसीएस ते एफएफपीओ चे बळकटीकरन, योजना अमलात आणताना संस्थाना येणाऱ्या अडचणीतून मार्ग कसा काढावा, याबरोबरच एनएफडीबी मध्ये नोंदणी आणि एलआयएफएलसीच्या ट्रेनिंग मध्ये मोठ्या प्रमाणत मत्स्य व्यवसायिकानी सहभाग घेण्यासाठी आवाहन केले.

कार्यशाळेची सांगता करताना एनसीडीसी प्रोग्राम ऑफिसर आशिष शिरसाठ यांनी मच्छीमारांच्या विविध शंकेचे व प्रश्नांचे निरसन केले व त्यांना एनसीडीसीकडून आश्र्वासित करत भविष्यात येणाऱ्या नवीन योजनेची ही माहिती दिली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!