भद्रावती : जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कुलदीप अनिल बोधाने विभागस्तरावर विजयी झाला असून तो आता राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कुलदीपच्या या यशाबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रिडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, सचिन मेश्राम, रविंद्र नंदनवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते, कुलदीप ने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षिक माधवी बोधाने, समीक्षा बोधाने करण नेव्हारे तसेच श्रीगुरुदेव सेवा मंडळ व श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावती यांना दिले.






