भद्रावती : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षाच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिलेली आहे. त्यानुसार भद्रावती तालुक्यामध्ये ७ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. शनिवारी भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य कुशल मेश्राम, तालुका अध्यक्ष विशाल कांबळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संध्या पेटकर, महिला आघाडी शहराध्यक्ष तसेच नगरसेविका राखी रामटेके,नगरसेवक सुनिल खोब्रागडे, प्रकाश पेटकर, देवेंद्र वानखेडे, सुमेध घुटके, गंमतीदास रायपुरे, नगरसेविका सीमा ढेंगळे, वैशाली चिमुरकर, लता टिपले, मनोरमा मुन, यमु राऊत, प्रिया कांबळे, मालु पाटिल, जया मेश्राम, तृप्ती वानखेडे, ज्योती देवगडे, बबिता रामटेके, मिली वाघ, सतीश म्हस्के, बंटी रायपुरे, नितीन देवगडे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.






