spot_img
spot_img
23 C
New York
Wednesday, August 5, 2026

गौतम नगर वासीयांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

अशोका बुद्ध विहार आणि तथागत बुद्ध विहार यांची संयुक्त "कँडल मार्च"

भद्रावती, दि. ०७ : येथील गौतम नगर वासीयांकडून दि.०६ डिसेंबर ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “कँडल मार्च” काढून अभिवादन करण्यात आले.

प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. गौतम नगर येथील अशोका बुद्ध विहार, स्नेहल नगर येथील तथागत बुद्ध विहार आणि छत्रपती नगर येथील नागरिकांनी गौतम नगर ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत संयुक्तपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध पद्धतीने “कँडल मार्च” काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला त्रिवार वंदन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तिन्ही विहार परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!