दारव्हा प्रतिनिधी..
आरोग्य विभागामार्फत दि.०४ ते १० डिसेंबर हा राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या जंतनाशक सप्ताहाचे औचित्य साधून आज मुंगसाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा येथे वर्ग ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे डोज प्राचार्य डॉ. सुनील चकवे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
दि.०२डिसेंबर २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथे जंतनाशक सप्ताह राबविण्यासंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात दारव्हा तालुक्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा आयोजित करुन वैद्यकीय अधीक्षक मा.गोकुळे साहेब तथा वैद्यकीय निरीक्षक मा.राजेश ढाकडे यांनी जंतनाशक गोळ्या देणे का गरजेचे आहे? यासंबधी सविस्तर मार्गदर्शन केले . दि.४ते १० डिसेंबर पर्यंत वय वर्षे ६ ते १९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे डोज देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
मुंगसाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा येथे राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाचे याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुनील चकवे, कनिष्ठ विभाग प्रमुख डाॅ. सौ. सुषमा गावंडे , प्रा. यश पवार, कु. वैशाली कुमरे, मनिषा गावंडे, प्रा. रजनिकांत घुंगरराव, डॉ. जुगल धोटे, केशव डहाणे, सचिन तावडे, कु. सिमा ठाकरे, कु. निशा माटोडे, सौ. स्मिता धोटे, प्रा. नितिन पिसे व दिनेश बावणे यांची उपस्थिती होती.
मुंगसाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून ह्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रमात महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक तथा प्राचार्य डाॅ.सुनील चकवे सातत्याने अग्रेसर असल्याने विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, सचिव प्रा.डाॅ.सौ.संगीता घुईखेडकर आणि उपाध्यक्ष विराज घुईखेडकर यांनी त्यांचे अभिनंदन भिनंदन केले.






