भद्रावती
स्थानिक डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत संविधान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयामध्ये संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. प्रशांत पाठक यांनी संविधानाचे महत्व विषद करताना समता, न्याय , स्वतंत्र, बंधुता हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे व दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी सविंधान दिन साजरा केला जातो. संवैधानिक आदर्शांबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून संविधानाच्या मूल्यांना जोपासले पाहिजे असेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. कपिल राऊत यांनी संविधानात अंतर्भूत असलेल्या मूलभूत हक्क व कर्तव्यांचा मानवी जीवनात असणारे महत्त्व बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मानवी मूल्य समाजात रुजविण्यासाठी संविधानाचे वाचन आवश्यक असणे गरजेचे आहेत. विशेषतः भारतीय राज्यघटनेत समाविष्ट तत्वे आणि उदाहरणे आहेत ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मुलभूत राजकीय तत्वे, अधिकार , कायदे, मार्गदर्शक तत्वे इत्यादी ठरविण्यात आले आहे अशी भूमिका प्रा. प्रज्ञा लांडे यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सांगता प्रा. नेहा मानकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून आभार व्यक्त केले. याप्रसंगी असंख्य विद्यार्थांसह प्रा. प्रिती कांदिकट्टीवार, प्रा.विशाल प्रसाद, सिमा हवेलिकर, पुनम काळे यांची उपस्थिती होती.






