भद्रावती : कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्ताने ऑल रिलीजन यूथ फाऊंडेशन कोंढा, भद्रावती सुधाकर बतकी यांच्या मार्गदर्शनाखली व नितेश बनोत यांच्या नेतृत्वात पोलिस ठाणे आणि सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन साजरा केला.

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त २४ तास काम करणाऱ्या व देशाची सेवा करणाऱ्या भद्रावती पोलीस स्टेशनचे एपीआय सुधीर वर्मा यांच्या उपस्थिति मध्ये व तसेच नंदकिशोर खनके व पोलीस बांधवाना व तसेच भद्रावती सरकारी दवाखाना मधील डॉक्टर, कर्मचारी याना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशांत दानव, आनंद थेरे, राहुल नागपुरे, दत्ता दैवलकर, सचिन गमे, रोहित गवळी, वैभव पिंपळकर, समीर पाकमोड़े,संतोष वरखड़े, संदीप सर्वे, निवृत्ती धोबे महाराजांची प्रतिमा देताना उपस्थित होते.






