जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे करण्यात आले दाखल
वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील घटना
जवळपास दोन तासापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
वरोरा
तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द समोर असलेल्या लोनकर राईसमिल जवळ सातच्या दरम्यान दुचाकी क्र. एम. एच. ३४ ए. क्यू. २१८३ ला अज्ञान वाहणाने धडक दिल्याने एक मुलगा जागीच ठार झाला असून, दोघे जखमी आहे, जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरारो येथे दाखल करण्यात आले..
हिमांशू भाविक जुनारकर अंदाजे वय वर्षे २२ हा जागीच ठार झाला असून, आदर्श विजय तुराणकर, साईल श्रावण बावणे हे दोघे जखमी झाले आहे. सर्व चारगाव बुद्रुक येथील रहिवासी असून घटनास्थळी चिमूर उपनिरीक्षक राकेश जाधव तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश यादव, पोलीस कर्मचारी दाखल आहे असून परिसरातील शेकडो गावकरी यांनी मृत व्यक्तीला जखमीना नुकसान भरपाई मिळनार नाही तोपर्यंत प्रेत उचलु देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
वरोरा शेगाव,चिमुर ३५३ ई राष्ट्रीय मार्गाने दोन तासापासून महामार्गावर तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते.

यावेळी अज्ञान वाहत शंशयास्पद गाडीमध्ये ब्यारेल असलेली शेगाव जवळ चंदणखेडा टी पाईन्ट जवळ पोलिसांनी पकडले असून दोन आरोपीला शेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केलेले आहे…
दरम्यान २ तास नंतर जमावाणी हायवेवर टायर जाळून घटनेचा निषेध केला आहे.







