गुरे चरण्याच्या जागेवर वन अधिकाऱ्यांनी गुराख्याला मारण्याचा अधिकार दिला कोणी? गावकऱ्यांचा प्रश्न
दि. २६ ऑक्टोबर
भद्रावती
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील वडाळा (तु) येथील गुराखी हा दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी वन चराई क्षेत्रा मध्ये गावातील गुरे चारत असताना सदर क्षेत्रातील वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी राउंड वर असताना दुपारी अंदाजे १ वाजता कुठलीही विचारपूस न करता अथवा समजूत न देता अचानक पणे गुराख्याला मारहाण सुरु केली. ही घटना गुरे चराई क्षेत्रातील असल्या कारणाने त्यांनी सगळी आपबीती गावातील नागरिकांना सांगितली दरम्यान गावातील लोक हे सदर प्रकारामुळे संतप्त झाले असून या घटनेचा निषेध करत आज दि. २६ ऑक्टोबर ला त्यानि ग्रामपंचायत कार्यालय तर्फे वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय ( वन्यजीव ) ताडोबा कोर यांना लेखी निवेदन दिले व जो पर्यंत सदर अधिकारी यांची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही होत नाही तो पर्यंत आम्ही या कार्यालय प्रांगनातून ठिया आंदोलन हटवणार नाही अशी भूमिका घेतली आहे. व समस्त गावकरी हे सकाळी १० वाजेपासून सदर कार्यालय प्रांगणात ठिय्या आंदोलनाला बसलेले होते

अखेर सायंकाळी ४ वाजता वनपरीक्षेत्र अधिकारी हे रजेवर असल्या कारणांनी फोन द्वारे येत्या सोमवारी आपण सगळे या वर चर्चा करू असे आश्वासन दिल्या नंतर गावाकऱ्यांनी ६ तासा नंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले
दरम्यान आमचे प्रतिनिधी यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी यांचेशी फोन द्वारे सम्पर्क केला असता त्यांनी अशी माहिती दिली कि गुरख्याची गुरे ही कोर क्षेत्रामध्ये चरत असल्या कारणांनी मी फक्त त्याला तिथून बाहेर काढले त्याला कुठलीही मारहाण केलेली नाही. शिवाय तो या आधी ३ वेळा त्या क्षेत्रामध्ये दारू पिऊन पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्याला आम्ही आमच्या वाहणात टाकून आणले. व त्या क्षेत्रामध्ये रोमा वाघिणीचे वास्त्यव्य असून तिला चार पिले असल्या कारणांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये या साठी त्याला दमदाटी देण्यात आली अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा वन्यजीव वडाळा ( भाविक चिवन्डे ) यांनी दिली






