spot_img
spot_img
23 C
New York
Wednesday, August 5, 2026

‘हेल्पिंग हँड्स’ तर्फे गरजूंना कपडे वाटप

दिवाळी आणि सणासुदीचे औचित्य साधून कपडे व मिठाई वाटप

भद्रावती : शहरातील स्थानिक एनजीओ ‘हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती’ अनेक प्रकारचे उपक्रम भद्रावती शहरांमध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये सतत राबवत असतात. अश्यातच ही हेल्पिंग हँड्स NGO टीम गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना कपडे व मिठाई वाटप करण्याचा उपक्रम दि. २४ ऑक्टोबर रोजी अगदी यशस्वी पणे पार पडला.

भद्रावती परिसरात रेल्वे रुळाचे काम करण्याकरिता आलेल्या कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला हिवाळा, दिवाळी आणि सणासुदीचे औचित्य साधून कपडे व स्वीट वाटप करण्यात आले. भद्रावती व डिफेन्स कॉलनी परिसरामधील अनेकांनी कपडे दान करून या उपक्रमाला सहकार्य केले. दान स्विकारणाऱ्या गरजूंनी अतिशय आनंदाने या उपक्रमाचे स्वागत करून नम्रतेने सहकार्य केले. जवळपास २५० गरजु लोकांपर्यंत आज हेल्पिंग हँड्सच्या टीमने पोहचून मदत केली.

या उपक्रमाला सहकार्य व योगदान देणाऱ्या प्रत्येकालाच एक वेगळा करुणेचा, दानाचा व हर्षोउल्लासाचा अनुभव नक्कीच आला असे सर्वांच्या मनोगतातून समजले. हेल्पिंग हँड्स NGO भद्रावती मधील सतत योगदान व सहकार्य करणारे सोनल उमाटे, कृतांत साहारे, प्रशांत सातपुते, सुकेशनी मानकर, स्नेहा सातपुते, रीता सहारे, हर्षदा हिरादेवे, दीपक कावटे, जया सपाटे पवन दासलवार, राजरत्न पेटकर, अनिकेत बांबोडे, रोहिणी पडवेकर, स्वप्निल मत्ते, मनोज पेटकर, अंकित तोडे, सागर निरंजने, कैश शेख, निखिल उंबरकर, श्वेता उंबरकर, प्राची वेल्हेकर, आशिष मल्लेलवार, तुषार दुर्गे, मंजूताई थुल, प्रगती उमाटे, रुही पठाण, जबीन शेख, ज्योत्सना कुरेकर आणि इतर सर्वांचे आभार मानण्यात आले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!