spot_img
spot_img
22.6 C
New York
Tuesday, August 4, 2026

शहनाज अख्तर च्या गीतांनी भिसीकर झाले मंत्रमुग्ध…..

कोजागिरी पौर्णिमा उत्सव समिती भिसी मध्ये प्रसिद्ध गायिका -शहनाज अख्तर

भिसी

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त्याने आज दि. २१ आक्टोबर २०२४ रोज सोमवारला भिसी येथील प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान च्या भव्य पटांगणावर प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तीगीतांचा व भजन संध्याचा भव्य कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता आयोजित केला होता. कोजागिरी पौर्णिमा उत्सव तथा स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त आयोजित सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर (LIVE MUSIC & PERFORMANCE) यांचा भव्य जागरण तथा भक्ती गितांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या गायनाने भिसी येथील जनता मंत्रमुग्ध झाली.

या भजन संध्या कार्यक्रमाचा भिसी व आजूबाजूच्या परिसरातील हजारोच्या संख्येने नागरीकानी परिवारासह आनंद घेतला.
भिसी शहरवासीयांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून भव्य जागरण कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे प्रसिध्द गायिका शहनाझ अख्तर यानी महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत गात प्रेक्षकांना गाण्याच्या तालावर रिझविले…..

भव्य जागरण कोजागिरी पौर्णिमा उत्सव समिती कार्यक्रमाला भिसीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला व भिसिवासियानी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशोर आष्टनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री पंकज गाडीवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोजागिरी पौर्णिमा उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा परिसरातील शेकडो जनतेनी आनंद लुटला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!