spot_img
spot_img
28.9 C
New York
Sunday, August 2, 2026

निमडेला वासियांचा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार

गावाकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी याना निवेदन

जणप्रतिनिधीना गावबंदी करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय

दि. १४ ऑक्टोबर

वरोरा :- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या निमडेला या गावात एकूण १९३ मतदाते आहेत. पण येणाऱ्या विधानसभा तसेच जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकावर समस्त गावाकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकी दरम्यान गावात प्रचार करिता येणाऱ्या प्रतिनिधीना गावाबंदी करण्याचा सुद्धा निर्णय या गावाकऱ्यानि घेतला आहे.

गावाकऱ्यांनी सांगितले कि मागील ४० वर्षा पासून त्यांच्या मागण्या प्रलंबित असून त्यांना चंदई नाला च्या प्रकल्पा वेळी स्थलांतरीत करून त्यांच्या जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. ते अध्यापही पूर्ण झाले नाही तसेच या बद्दल यांनी कित्तेकदा आंदोन केले परंतु याचा काहीही फायदा झालेला नाही. तसेच सध्या सगळा ऑनलाईन कारभार सुरु असताना मात्र या गावाचा रेकॉर्ड ना चिमूर पंचायत समितीला आहे ना वरोरा पंचायत समितला आहे. त्यामुळे या गावातील लोकांचे ऑनलाईन असलेले सगळेच काम खोळंबले आहे. एवढेच नव्हे तर या गावात १५/१७ आदीवासी शबरी घरकुल योजनेचे घरे मंजूर झाले असून निवळ या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकही घरकुल काम सुरु झाले नाही. तसेच आणखी ही अनेक समस्या असल्या कारणाने शेवटी या गावाकऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!