भद्रावती
सौ. मयूरी विशाल शिंदे यांना नुकतीच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील संगणक विभागातील आचार्य पदवी जाहीर करण्यात आली. त्यांचा विषय “INFORMATION STREAM METHODS FOR CLUSTER ANALYSIS TOWARDS EVALUATING STANDARD SYNTHETIC DATA STREAM AND AUTHENTIC LIFE DATA STREAMS” हा होता . निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मोहिनूद्दीन कादरी तसेच प्राध्यापक डॉ. एस. बी. किशोर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रबंध सादर केला होता. त्यांच्या प्रबंधावर विद्यापीठात नुकतीच मौखिक परिक्षा घेऊन पीएचडी जाहीर करण्यात आली.
सौ. मयूरी विशाल शिंदे यांचे संशोधनपर शोधप्रबंध स्कोपस इडेक्स डब्लु. ओ. एस. तसेच यू.जी.सी. सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रिकेत प्रकाशित झाले असून अनेक परीसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या संशोधनाचा उपयोग वैद्यकीय व बँकिंग या सारख्या क्षेत्रात करता येणार आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव स्वर्गीय नीलकंठराव शिंदे, (माजी आमदार) व तत्कालीन अध्यक्ष श्रीमती नीलिमा ताई शिंदे , वडील श्री. गणेशराव घोडमारे, आई सौ. छबूताई घोडमारे तसेच पती प्राध्यापक डॉ. विशाल शिंदे यांना दिले.
त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे समस्त विश्वस्त मंडळ तसेच यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.






