भद्रावती
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडल्या. या जिल्हास्तरीय स्पर्धेत १७ वर्ष मुले वयोगटात अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा दारुण पराभव करत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती या संघाने घवघवीत यश संपादन केले व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. विभागीय कबड्डी स्पर्धेत हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जिल्हास्तरावर कबड्डी स्पर्धेत अव्वल येऊन विभाग स्तरावर निवड झाल्याने कबड्डी खेळाडू संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार ,माधव केंद्रे, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक, शुभम सोयाम, अजीज शेख, जिल्हा कबड्डी प्रशिक्षक , समस्त प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.






