spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर

लोकमान्य विद्यालय भद्रावती चे शिरपेचात मानाचा तुरा

भद्रावती : गडचिरोली येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा १७ वर्षाखालील मुलांचा व्हालीबॉल संघ विजयी झाला असून हा संघ यानंतर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विभाग स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालयाच्या या संघाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करीत सर्वप्रथम गोंदिया जिल्हा त्यानंतर चंद्रपूर मनपा व अंतिम सामन्यामध्ये बलाढ्य नागपूर ग्रामीण संघाला जोरदार टक्कर देत अटीतटीच्या लढतीत तिसऱ्या सेटमध्ये दणदणीत विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेकरीता आपले स्थान पक्के करून भद्रावतीच्या तसेच लोकमान्य विद्यालयाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विजेत्या व्हॉलीबॉल संघामध्ये साहिल पिंपळकर, अथर्व रणदिवे, हर्षित कवाडे, सुजल जट्टलवार, सोहम खिरटकर, यश पिंपळकर, निशांत नगराळे, आदित्य रणदिवे, मोहित मारोटकर, यश पाटील, अथर्व क्षीरसागर, अरमान अली या खेळाडूंचा सहभाग होता.

विजयी संघाचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, विशाल गावंडे, रविंद्र नंदनवार, प्रतिक नारळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश मत्ते, प्रफुल चटकी, प्रवीण झाडे, आदर्श आसुटकर यांना दिले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!