भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यासोबतच बालिका संरक्षण दिन, हा दिवस सुद्धा साजरा करण्यात आला.
बालिका संरक्षण दिनाचे अवचित्य साधून आदरणीय गटशिक्षणाधिकारी साहेब डॉ प्रकाश महाकाळकर, तथा विस्तार अधिकारी सौ. सिद्धामशेट्टीवार मॅडम, यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. विद्यार्थिनींना गुड टच- बॅड टच, याविषयी माहिती दिली.
तत्पूर्वी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंशासनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक व शिक्षिका होऊन आपल्याच वर्गातील मित्र-मैत्रिणींना शिकवून त्यांच्यापुढे शिक्षकाचे आदर्श उभं केलं.
या संपूर्ण कार्यक्रमाला आदरणीय गटशिक्षणाधिकारी साहेब डॉ प्रकाश महाकाळकर, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, विस्तार अधिकारी सौ सिद्धमशेट्टीवार मॅडम, श्री ए एम देशमुख सर, सौ उज्वला वानखेडे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी क. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी न अंकित येरगुडे व धनश्री आसेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, नंदनवार , कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना एक छोटीशी भेट देऊन कार्यक्रमाचं समारोप झालं. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा पोतराजे यांनी केले तर आभार प्रदर्शन लावण्या खंडाळकर हिने केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.






