spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

शिंदे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न..

खेळाडूंना क्रीडा किट चे वाटप..

भद्रावती

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे संपन्न झाला. याप्रसंगी खेळाडूंना क्रीडा चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मेजर ध्यानचंद यांची जयंती संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे ,प्रमुख अतिथी शेखर जुमडे ,किशोर ढोक क डॉ. ज्ञानेश हटवार , तेजस्वी नार्वेकर मॅडम उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी हाकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा आदर्श आपल्या पुढे ठेवून आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात आपण नैपुण्य प्राप्त करावे, त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंना क्रीडा किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. माधव केंद्रे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मैदानात खेळाडू मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!