spot_img
spot_img
28.3 C
New York
Saturday, August 1, 2026

झाडीबोली साहित्य मंडळातर्फे प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांचा सत्कार..

एक वार साहित्याचा स्तुत्य कार्यक्रम…

भद्रावती

झाडी बोली साहित्य मंडळ भद्रावती च्या वतीने दर शुक्रवारी एक वार साहित्याचा हा उपक्रम अनेक वर्षांपासून सातत्याने नियमितपणे चालू आहे. या उपक्रमात दि.१९ जुलै २०२४ शुक्रवार ला झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावती तर्फे हृतात्मा स्मारक येथे डॉ ज्ञानेश हटवार यांचा सत्कार करण्यात आला.

झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीच्या वतीने एक वर शुक्रवार या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती चे मा. माधव कौरासे सर जेष्ठ कवी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष , मा. सुरेश परसावर सर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती , सत्कारमूर्ती मा. प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार सर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांना पुणे येथील एका कार्यक्रमात “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रा. परसावार सर यांनी “झालीबोली साहित्य मंडळ भद्रावतीचे सदस्य व विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती चे सचिव प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ऋद्रांश फाउंडेशन मुंबई तर्फे “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित केले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे ,” असे मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कौरासे सर यांनी त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, असे सांगून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर उपस्थित कविमित्रांचे कविसंमेलन व गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडीबोली मंडळाचे सचिव श्री शालिक दानव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत उज्वलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण आडेकर यांनी केले. याप्रसंगी भद्रावती शहरातील मान्यवर कवीमंडळी बालकवी मयंक दर्वे, मा. सु. वी. साठे सर, मा. मुजुमदार, मा. कुचानकर, मा. रामटेके, मा. वाणी, मा. अजय दर्वे, मा. रमेश भोयर, मा. सुमेध पुनवटकर, अरुण घोरपडे तसेच इतर कवीमित्रांचा विशेष सहभाग होता.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!