भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी येथे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर यांनी जीवनात योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
सकाळी ६.३० वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
यावेळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन, प्राथमिक शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विविध योगासने केली.
यावेळी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्राध्यापक डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, रमेश चव्हाण, किशोर ढोक, हरिहर मोहरकर, नरेश जांभुळकर, उमेश पाटील, आत्माराम देशमुख, मेघश्याम ठिकरे, मुख्याध्यापक प्रवीण शिंदे, सुरेश आसुटकर , सुहास कोल्हे, मडावी सर, झाडे सर इत्यादी कनिष्ठ महाविद्यालय, विद्यालय , प्राथमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.






