चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर अंतर्गत एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालय, चंद्रपूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्य आज १ मे सोमवारला अध्यक्ष ॲड. विजय मोगरे फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. विजय मोगरे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयी मौलिक मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास सचिव ॲड. पुरुषोत्तम सातपुते फिमेल एज्युकेशन सोसायटी, गजानन गावंडे अध्यक्ष, शाळा समिती, सदस्या शांता पोटदुखे, केशवराव शेंडे सदस्य फीमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर तसेच प्राचार्या मीनाक्षी ठोंबरे, प्राचार्या बुटले, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन कुरेशी व समारोप प्राध्यापक आनंद वानखेडे यांनी केले.






