बालकुमार फन अँन्ड लर्न चा समारोप…
भद्रावती
भद्रावती येथील साहित्यिक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीचे सचिव शालिक दानव सर लिखित नटखट नाटक वाडी या बालनाट्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, चित्रकार, प्राचार्य सदानंद बोरकर नवरगाव व ना. गो. थुटे सर ज्येष्ठ साहित्यिक वरोरा यांच्या हस्ते दि.1/6/2024 ला मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह सब्जी मार्केट भद्रावती येथे संपन्न होते आहे.
भद्रावती येथील साईप्रकाश कला अकादमी व बालकुमार फन अँड लर्न द्वारे आयोजित उन्हाळी सुट्टी विशेष शिबिरा चा समारोप कार्यक्रम संपन्न होत आहे. समाजसेवक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते शालिक दानव सर द्वारा लिखित नटखट नाटकवाडी या बालनाट्यसंग्रहाचे प्रकाशक उद्या दिनांक 1 जून 2024 ला श्री मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह सब्जी मार्केट भद्रावती येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध लेखक व चित्रकार, प्राचार्य सदानंद बोरकर सर नवरगाव यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ वरोराचे मार्गदर्शक आचार्य ना.गो. थुटे सर ज्येष्ठ साहित्यिक वरोरा हे आहेत. नटखट नाटकवाडी या बालनाट्यसंग्रहावर भाष्यकार म्हणून नरेशकुमार बोरीकर लेखक, नाट्यकर्मी व अध्यक्ष फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून बालकलाकार शास्त्रीय तथा सुगम संगीत गायक आर्श चवरे वर्धा उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यानंतर बालकुमार फन अँड लर्न या विशेष शिबिराचे समारोपिय कार्यक्रम सुद्धा याच सभागृहात होणार आहे. तेव्हा साहित्य प्रेमी, कलाप्रेमी, झाडीबोली साहित्य मंडळाच्या सदस्यांनी, पालक व नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन साई प्रकाश कला अकादमी द्वारे करण्यात आले आहे.






