संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय शेगाव बु याचे १००% विद्यार्थी उत्तीर्ण
वरोरा :- दि. २७ मे.
काल दि. २७ मे. २०२४ ला जाहीर झालेल्या १० विच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकलमध्ये संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय शेगाव बु मधील एकूण ५० विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या त्या पैकी ५० सही विद्यार्थिनी यांनी पास होत विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या मध्ये कु. अनुष्का भाऊराव साखरकर या विद्यार्थिनीने ९२.८०% मार्क्स घेत विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिडवीला आहे.
कु. श्रेया विलास चवले व कु. ख़ुशी विकास नवघरे या दोन्ही विद्यार्थिनी यांनी ८९.४०% मार्क्स घेत विद्यालयातून द्वितीय येण्याचा मान पटकविलेला आहे.
त्यांच्या या यशासाठी विद्यालयातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मुख्याध्यापक, शिक्षकांवृंद, व सह कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.






