९७.९१% लागला निकाल
वरोरा, दि. 22 : काल लागलेल्या बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात वरोरा तालुक्यातिल शेगाव बु. येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवत उत्कृष्ट निकाल दिला.
१२ विच्या परीक्षेला एकूण १४४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४१ विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने मागील वर्षी पेक्षा जास्त निकाला दिला आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी ७% ने निकाल जास्त लागला असून कु. तृप्ती बंडू नन्नावरे हिने ७८.१७% मार्क्स मिळवत शाळेतून पहिली येण्याचा मान मिळवलेला आहे. तर शेख नौशाद रहिमतुल्ला शेख हिने ७४.८३ % मार्क्स मिळवत दुसरी येण्याचा मान मिळवलेला आहे. तर कु. नंदिनी प्रकाश गुरनुले हिने ७१.३३% मिळवत ३ री येण्याचा मान मिळविलेला आहे.
त्यांच्या या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापक बालाजी ढाकुणकर व शिक्षकांवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






