३२ रकदात्यांनी रक्तदान करून केला लग्नाचा अगडावेगडा सोहळा साजरा
भद्रावती, दि 22 : तालुक्यातील चंदनखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या छोटेसे गाव चरुर धारापुरे. या गावातील युवा समाज परिवर्तनाची जाणिव असलेले अमोल मुरलीधर दडमल व आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना यांच्या पुढाकाराने अमोल दडमल यांच्या लग्नसमारंभ तथा स्वागत समारंभाचे औचित्य साधून काल दि. २१ मे ला मानिका भवन येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात छोट्याशा चरुर गावातील व चंदनखेडा परिसरातील ३२ रक्तदात्यांनी स्वच्छेने येवुन रक्तदान केले. सर्व रक्तदांत्याना लगेच वर वधू व आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना चरुर धारापुरे यांच्या कडुन पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवुन सन्मानीत करण्यात आले.
बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा, बिरसा मुंडा क्रिडा मंडळ कोकेवाडा (मा), विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ व चरुर धारापुरे येथील ग्रामस्थांचे या रक्तदान कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.






