भद्रावती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत फेब्रुवारी -मार्च 2024 ला वर्ग बारावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेच्या निकालाची अनेकांना प्रतीक्षा होती. बहुप्रतिक्षित असलेला बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार असून तो विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा महाराष्ट्रात नऊ विभागामार्फत घेण्यात आली. परीक्षा सुरू असतानाच शिक्षकांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यासाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल उशिरा लागेल असा कयास व्यक्त केला जात होता. आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विचार करून पेपर तपासणीवरील बहिष्कार तात्काळ मागे घेतला . या निकालाची प्रतीक्षा अनेकांना लागली होती. पण शिक्षकांच्या कार्य कुशलतेमुळे ती प्रतीक्षा आता संपलेली असून उद्या दिनांक 21 मे 2024 ला दुपारी एक वाजता बारावीचा निकाल शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना तो पाहता येणार आहे,असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या अध्यक्षा अनुराधा ओक यांनी जाहीर केले आहे.






