भद्रावती
भद्रावती येथील स्वराजनगरी गवराळा येथे दोन दिवसीय भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन दि. ४,५ मे २०२४ ला श्री वरद विनायक खो-खो मंडळ व हेल्पिंग हँड NGO भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
आजच्या वेगवान काळात विद्यार्थी हा अभ्यास ऑनलाइन करतो आणि खेळाबद्दलची भावना ही सुद्धा बदललेली दिसू लागली आहे, विद्यार्थी माती मधील खेळ विसरायला लागला आहे आणि फक्त खोलीमध्ये ऑनलाईन खेळ खेळायला लागला आहे, मातीतील खेळ खेळून शरीर सुदृढ बनवता येते व निरोगी राहते हा उद्देश समोर ठेवून आयोजकांनी भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन केलेले होते.
सदर स्पर्धेला प्रथम पारितोषिक ७००० रुपये सौ. मीनलताई आत्राम व जानकी ट्रेडर्स भद्रावती, द्वितीय ५००० रु मनीष बुच्चे व जानकी ट्रेडर्स, तृतीय ३००० रु जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ, सोबतच आकर्षक बक्षिसे – शुभम सुरपाम, श्री लिमेश माणूसमारे, प्रा.श्री रमेश चव्हाण, श्री सुनील वैद्य, श्री विजय डुकरे, यांच्याकडून होते.
अंतिम सामना अतितटीचा श्री वरदविनायक क्रीडा मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला द्वितीय क्रमांक जय जगन्नाथ वॉरियर आणि तृतीय द्रोणाचार्य क्रीडा मंडळ भद्रावती सोबतच उत्कृष्ट बक्षिसे सोहन गज्जेवार, हार्दिक निंबाळकर, कुंदन नांदे, रितिक कांबळे, प्रशांत बडगुवार, रोशन इस्टाम,सावन आत्राम, दिनेश चिंचोलकर, कुणाल आमने, यांना सन्मान चिन्ह देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मीनलताई आत्राम, श्री विजय डुकरे, श्री मनीष बुच्चे, श्री लिमेश माणूसमारे, राजुरकर सर व आयोजक समिती प्रमुख सावन आत्राम आणि अध्यक्ष जयदीप घरडे, उपाध्यक्ष मयूर कोडापे, सचिव आदेश पारखी, सहसचिव मारुती दुरुटकर ,कोषाध्यक्ष ओम अंबलवार आणि हेल्पिंग हँडसे स्वप्निल मत्ते, अंकित तोडे, कृतांत सहारे, मनोज पेटकर तसेच मंडळाचे सहकारी आकाश भोयर, नागेश मिटपल्लीवार , नागेश रामटेके , समर्थ बारसागडे , उत्कर्ष किन्नाके, शिवम घोरूडे, रितिक हजारे, श्रद्धा मागीलवार, एकता खंडाळकर, भूषण खोके, मंगेश शेडमाके, व इतर सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यास आपले योगदान दिले.






