भद्रावती : तालुक्यातील गुळगाव येथे हनुमान जयंती निमित्त किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच गुरूदेव सेवा मंडळाला राहुल मालेकर यांनी साऊंड सिस्टम भेट दिले.
हनुमान जयंती ही आपल्या भारतात साजरे होणारे एक धार्मिक हिन्दु सण. तालुक्यातील गुळगाव हे ईरई नदी ताडोबा अभयारण्याला लागू असलेले टोकाचे गाव. दरवर्षी या गावात सर्व गावकरी मिळून सहमताने धार्मिक उत्सव साजरे करत असतात. याचप्रमाणे हनुमान जयंतीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने किर्तन भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच महाप्रसाद आयोजित करण्यात आले.

याच हनुमान जयंती उत्सवादरम्यान भद्रावती तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना अधिकारी राहुल मालेकर यांनी श्री गुरूदेव सेवा मंडळ गुळगाव यांना भजन, किर्तन, आध्यात्मीक कार्यक्रम घेण्याकरीता जनहितार्थ साऊंड सिस्टम भेट दिले. श्री गुरूदेव सेवा मंडळ गुळगाव यांनी साऊंड सिस्टम भेट दिल्याबद्दल राहुल मालेकर यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता शाखा प्रमुख राजू वैद्य, उप शाखा प्रमुख प्रफुल दोहतरे, मंडळाचे अध्यक्ष अनंता बावणे, प्रमोद ढाले, नागेश सोनटक्के यांच्यासह गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थीत सर्व गावकरी मंडळीनी महाप्रसादाच लाभ घेत हनुमान जयंती कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.






