भद्रावती : येथील श्री साई कॉन्व्हेंटमध्ये श्री साई कॉन्व्हेन्ट स्टेट आणि श्री साई कॉन्व्हेन्ट सी.बी.एस.सी. यांच्या
संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका किरण कोथळे, देवानंद जुमडे, बबीता पेटकर, किरण साळवे, पथाडे सर, गणेश यम्पलवार, प्रिती जोशी, अर्चना बदखल आदी मान्यवर मऺचावर उपस्थित होते.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प माला अर्पण करण्यात आले. त्या नंतर सामुहिक मानवंदना देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाली भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन आम्रपाली हेंडाळकर यांनी केले.

यावेळी प्रतिक्षा यमजनवार, सारीका शेंडे, श्वेता गीरी, सरस्वती लांडे, सुनील दैदावार, सुब्रतो मिस्त्री, सविता खोब्रागडे, शृखंल पेटकर, निशा कत्रोजवार श्रध्दा कोमटी, उषा दाते, पुजा आबोजवार, प्रिती डोर्लिकर सुजाता ढोके, सपना क्षीरसागर , दिपाली नागपुरे, नम्रता पतर॑गे, आदि शिक्षक वृंद उपस्थित होते.






