वरोरा : वरोरा-चिमूर महामार्ग वर शेगाव बु. मधील नळाची मुख्य पाईप लाईन लिकेज मुळे मागील महिना भरा पासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. पण ग्रामपंचायत मात्र या कडे लक्ष देण्याकरिता कुठल्या मुहूर्ताची वाट बघत होती हे त्यांनाच माहित. आधीच ८/१० दिवस नळाची वाट बघणारे गावातील नागरिक मात्र या मुळे त्रासून गेले होते.

याची दखल घेत ‘जागृत भारत’ न्यूज पोर्टल वर याची बातमी दि. ३ एप्रिल ला प्रसारित केली होती. याचाच दणका म्हणून कि काय महिनाभरापासून झोपेचे सोंग घेतलेली ग्रामपंचायत बातमी प्रसारित होताच कामाला लागून त्या नळाच्या पाईपलाईन लिकेज चे काम दुरुस्त करण्यास आज दि. ५ एप्रिल ला सुरूवात केली. त्यामुळे ग्रामवासीयांनी जागृत भारत या न्युज पोर्टल चे आभार मानले आहे.






