spot_img
spot_img
28.3 C
New York
Tuesday, August 4, 2026

निवडणूक खर्चाची लेखे तपासणी 4, 12 व 16 एप्रिल रोजी

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून 2024 ची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक खर्चाचे लेख तपासणी करून घ्यावयाचे आहे. याकरीता दिलेल्या तारीख व वेळेत संबंधित उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आले आहे.

13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया हे गुरुवार दि. 4 एप्रिल, शुक्रवार दि.12 एप्रिल व मंगळवार दि.16 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सदर तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या वेळेतच उमेदवारांना आपले निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करावयाचे आहेत. जे उमेदवार निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील बाब क्र.77 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र ठरतील. निवडणूक आयोगामार्फत अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी कळविले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!