🪷 शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला सुरुवात…
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी टं कार्यक्रम श्री साई इंजिनिअरिंग कॉलेज भद्रावती येथे सुरू झाले. यावेळी मार्गदर्शन करताना बीईओ डॉ प्रकाश महाकाळकर यांनी “नविन आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे”, असे सांगितले.
पंचायत समिती भद्रावती अंतर्गत इयत्ता ९ ते १२ ला शिकवीणाऱ्या शिक्षकांचे हे प्रशिक्षण श्री साई इंजिनिअरिंग कॉलेज भद्रावती येथे संपन्न होत आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष डॉ प्रकाश महाकाळकर बीईओ, भद्रावती तर प्रमुख अतिथी प्रो. कं सर उपप्राचार्य श्री साई इंजिनिअरिंग कॉलेज भद्रावती, तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, आत्माराम देशमुख, प्रा. विजय गायकवाड, निकुरे सर, ज्योती तावाडे , प्रतिभा कवाडे साधन व्यक्ती बीआरसी, जुनघरे मॅडम केंद्रप्रमुख उपासे मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. “नवीन राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांची क्षमता अद्ययावत व्हावी म्हणून हे प्रशिक्षण आयोजित केले आहे”, असे मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शक डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कवाडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती तावाडे मॅडम यांनी केले. विद्ये सर , गायकवाड सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या तालुकास्तरीय प्रशिक्षणाला ११७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.






